Aashay Inamdar
"घराची व्याख्या काय?"
या प्रश्नाचे उत्तर द्यायला कुठलेही खास असे सामर्थ्य लागत नाही ; तुमच्या कडे पैसे किती, तुमची ऐपत काय, तुमची शरीरयष्टी कशी, या पैकी एकही नाही.
तसेच, घर हे फक्त सिमेंट आणि विटांचे बांधकाम असते असा समज बाळगणे देखील चुकीचेच म्हणावे लागेल. ह्या दोन अक्षरी शब्दात सर्व विश्व समावून घेण्याची एक चमत्कारिक क्षमता असते.
|| वासुदैव कुटुंबकं ||
म्हणजेच, हे विश्र्वच आपले घर आहे.
कुण्या एका थोर व्यक्तीनी आम्हाला हा गुरुमंत्र दिला आहे जो फार जबाबदारी आणि काळजिनिशी पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एवढी विविधता ही एकाच बिंदूतून उगम पावली आहे ह्यावर विश्वास ठेवणे हे मानवी विचारक्षमतेच्या पलीकडचे आहे.
राजाचा राजवाडा, उंदराचे बीळ, आय. टी. कंपनीत काम करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाचे टू बी. एच. के, अंबानींचे अँटिला किंवा गरीबाची झोपडी. सर्व घरेच आहेत ना!
कधी कधी "घर" ही एक भावना आहे असे देखील म्हणता येईल.
तब्बल पस्तीस वर्षानंतर आपल्या शालेय मित्रांचे गेट टुगेदर करून आलेले माझे ८५ वर्षांचे आजोबा नाचत (अर्थातच कुवती प्रमाणे) घरी आले तेव्हा त्यांचा तो आनंद बघून एक "घरगुती ऊब" जाणवली.
एके दिवशी वर्तमान पत्रात बातमी वाचली, अब्जाधीश व्यावसायिकांनी आपली सर्व संपत्ती दान केली, "खरे जगणे तर हेच आहे".
भावनात्मक आणि संवेदनशील "मनुष्यपण" म्हणजेच "घर" असे म्हणायची मजल मारत आहे.
Translation:
"What is the definition of a home?"
It does not require any special ability to answer this question; How much wealth you have, how you look, your physique, none of these.
Also, it would be wrong to assume that a house is just a construction of cement and bricks. The two letter word Ghar has a miraculous ability to enclose the whole universe in itself.
|| Vasudeva Kutumbakam ||
That is, the universe is our home.
Some great person has given us this guru mantra which is our endeavor to carry forward with great responsibility and care.
It is beyond human comprehension to believe that such diversity originated from a single point.
The king's palace, a rat's burrow, the two BHK house of a person working in an IT company, Ambani's Antila or a poor man's hut. In the end all of these are "home".
It can be said that "home" is a feeling.
My grandfather had a get together with his school friends after almost 35 years. The smile on his face when he came back home gave me a warm feeling, the one you get when you reach home.
One day the news in the newspaper read, billionaire businessmen donated all their wealth, "This is the real life".
Today, I dare to say that emotional and sensitive (empathetic) "humanity" means "home".
Comments